'बाहुबली'तील देवसेनेच्या भूमिकेमुळं देशभरात पोहोचलेली दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या सौंदर्यानं अनेक तरुणांना घायाळ केलं आहे. पण अनुष्का शेट्टीचं मन दुसऱ्याच कुणावर तरी जडलंय. तो म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, जंटलमन खेळाडू राहुल द्रविड. 'माझं पहिलं प्रेम राहुल द्रविड हेच होतं,' असा गौप्यस्फोट तिनं केला आहे. एका तामीळ पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिनं ही 'मन की बात' सांगितलीय. 'राहुल द्रविड हा माझा सर्वात आवडता क्रिकेटर आहे. एकेकाळी राहुल माझा क्रश होता. तो मला खूप आवडायचा. एका टप्प्यावर तर मी त्याच्या प्रेमात पडले होते,' असं अनुष्का म्हणाली.'बाहुबली'मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रभासशी सध्या अनुष्काचं अफेअर असल्याची चर्चा आहे. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार असल्याचंही बोललं जात आहे. अर्थात, दोघांनीही अद्याप यास दुजोरा दिलेला नाही
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews